Sunday, 5 January 2014

Mala Ved Laagale Lyrics - Timepass
रंग बावऱ्या स्वप्नांना… 
 सांगा रे सांगा 
कुंद कळ्यांना वेलींना…  सांगा रे सांगा 
हे ध्यास ओठी कसे…  हे रंग ओठी कुणाचे 
का संग वेड्या मना मला…  भान नाही जगाचे
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे 
प्रेमाचे … प्रेमाचे 

नादावले धुंदावले… कधी गुंतले मन बावळे
नकळे कधी कोणामुळे … सूर लागले मन मोकळे
हा भास की तुझी आहे नशा
मला साद घालती दाही दिशा
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे 
प्रेमाचे … प्रेमाचे
जगणे नवे वाटे मालाल… कुणी भेटला माझा मला
खुलत काळी उमलून हा… मन मोगरा गंधाळला
हा भास की तुझी आहे नशा
मला साद घालती दाही दिशा
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे 
प्रेमाचे … प्रेमाचे  

No comments:

Post a Comment