Thursday, 21 April 2016

Ghagar gheun ghagar gheun nighali | घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन

रचना : संत एकनाथ
संगीत : रघुनाथ खंडाळकर

घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण …x२
ठुमकत ठुमकत चालली डोलत
वार्याच्या तोलान
वार्याच्या ग तोलान || धृ ||

हासत खुदु खुदु मोडीत डोळे …x२
मनी आठवी कृष्णाचे चाले
लगबगीने प्रभात काळी
आली नंद अंगणी
घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण …x२ || १ ||

आडवी वाट उभा शारधर …x२
सोड सोड कान्हा जाऊ दे लवकर …x२

एका जनार्दनी जाणे
न कळे या गौळणी
घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण …x२ || २ ||

Wednesday, 20 April 2016

Yad Lagla | याड लागलग याड लागलं र

Song Title : Yad Lagla | याडं लागलं ग
Movie Title : Sairat | सैराट (2016)
Lyrics / Lyricist: Ajay-Atul
Singer : Ajay Gogavale
Music Director / Composer : Ajay-Atul
Director : Nagraj Popatrao Manjule


याडं लागलं ग याडं लागलं गं

रंगलं तुझ्यातं याडं लागलं गं
वास ह्यो उसात येई कस्तूरीचा
चाखलंया वारं ग्वाडं लागलं गं
चांद भासतो दिसाच मावळाया लागलं
आस लागली मनात कालवाया लागलं गं
याडं लागलं ग याडं लागलं गं…याडं लागलं गं याडं लागलं गं
रंगलो तुझ्यातं याडं लागलं गं
वास ह्यो ऊसातं येई कस्तुरीचा
चाखलया वारं ग्वाड लागलं गं........... 

सांगवं ना बोलवं ना मनं झुरतया दुरून
पळतया टळतया वळतयं मागं फिरून.......
सजलं रं धजलं रं लाज काजला सारलं
येंधळ हे गोंधळलं लाङ लाङ गेलं हरुन.......
भाळलं असं ऊरातं पालवाया लागलं 
हे ओढं लागली मनातं चाळवायां लागलं
याडं लागलं गं याडं लागलं गं

हं...

सुलगं ना ऊलगं ना जाळं आतल्या आतल्या
दुखनं हे देखनं गं एकलचं हाय साथीला
काजळीला ऊजळलं पाजळूनं ह्या वातीला
चांदणीला अवतारं धाडतुया रोजं रातिला
झोप लागना सपानं जागवाया लागलं
पाखरुं कसं…. आभाळ पांघरायां लागलं
हं… 
रारीरारीरा रा रारारारा....