Thursday, 21 April 2016

Ghagar gheun ghagar gheun nighali | घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन

रचना : संत एकनाथ
संगीत : रघुनाथ खंडाळकर

घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण …x२
ठुमकत ठुमकत चालली डोलत
वार्याच्या तोलान
वार्याच्या ग तोलान || धृ ||

हासत खुदु खुदु मोडीत डोळे …x२
मनी आठवी कृष्णाचे चाले
लगबगीने प्रभात काळी
आली नंद अंगणी
घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण …x२ || १ ||

आडवी वाट उभा शारधर …x२
सोड सोड कान्हा जाऊ दे लवकर …x२

एका जनार्दनी जाणे
न कळे या गौळणी
घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण …x२ || २ ||

No comments:

Post a Comment